पनवेल दि.१२: केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दमदार पाऊले उचलली आहेत. त्या अनुषंगाने देश व राज्यासाठी हे जनतेचे अर्थसंकल्प आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य तथा मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे यांनी आज पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास या तत्त्वाने सर्वसामान्यांना प्रगतीभिमुख वाटेवर नेण्याचे काम अधिक जोमाने सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे उपस्थित होते.

प्रतिक कर्पे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढे सांगितले की, अर्थसंकल्पात शेवटच्या व्यक्तीचा विचार करताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पात बर्‍याच योजना लक्षवेधी ठरल्या आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन। ज्याची आस करी जन॥ या तत्त्वास अनुसरुन अर्थसंकल्प, असे म्हणत फडणवीस यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशी आहे. ‘पंचामृता’च्या माध्यमातून मांडण्यात आलेला अर्थसंकल्पात सर्वसामान्य घटकाचा प्राधान्याने विचार केल्याचे दिसतो. राज्याची अर्थव्यवस्था अधिक व्यापक करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर दिल्याचे ठळकपणे जाणवते.

अर्थसंकल्पातून सक्षम विकासाचा वेग – आमदार प्रशांत ठाकूर
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 सालापासून देशात विकासाचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे राजकारणाची परिभाषा बदलून देश प्रगतशील होत आहे. सबका साथ सबका विकास हे सूत्र कायम ठेवून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जात आहे. त्या अनुषंगाने केंद्रात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, तर राज्यात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करीत देशाच्या आणि राज्याच्या सक्षम विकासाचा वेग मांडला आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांच्या विकासाचे पंचामृत आहे, असे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!