Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps
पनवेल दि.३१: नववर्षाचे स्वागत करताना व्यसन करून वाईट पद्धतीने स्वागत न करता दूध पिऊन स्वागत करावे व व्यसनांपासून नागरिकांनी परावृत्त व्हावे यासाठी पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी व प्रभाग अधिकारी तसेच विभाग प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्याच्या नावाखाली मद्यसंस्कृतीकडे आकर्षित झालेल्या तरुणाईला परावृत्त करण्यासाठी तसेच गेल्या काही वर्षांमध्ये ३१ डिसेंबरला ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली युवा पिढीमध्ये मोठय़ा प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक युवक-युवती ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या अधीन होतात. हे ध्यानात घेऊन पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ‘द’ दारूचा नाही तर ‘द’ दुधाचा” या संकल्पनेतून अधिकारी वर्गास नववर्षाच्या शुभेछया दिल्या. यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी व प्रभाग अधिकारी तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी बोलताना सांगितले की, व्यसनामुळे व्यक्तीबरोबर कुटूंबे ऊध्वस्त होतात. विशेषत: तरूण वर्ग या व्यसनांकडे अधिक आकर्षित होत आहे. सामाजिक पातळीवर याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.