पनवेल, दि.२: पनवेल, उरण, नवी मुंबईसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अग्रेसर दैनिक म्हणून ओळख असणार्या दैनिक वादळवारा च्या वेबसाईट चे उद्घाटन बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वादळवारा चे संस्थापक दा चां कडू गुरुजी, वादळवाराचे मुख्य संपादक विजय कडू, दिलीप कडू, पत्रकार प्रदीप पाटील, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, संजय कदम, वादळवारा चे कार्यकारी संपादक प्रवीण कोळआपटे, कामगार नेते सुरेश पाटील,संतोष वाव्हळ,साहिल रेळेकर, जितेंद्र नटे, अनिल राय, गणपत वारगडा, सनिप कलोते,निलेश मोने, बाळाराम केदारी,मनोज ठाकूर, रामनाथ म्हात्रे,गोविंद पाटील,वामन कडू, क्षितिज कडू व भारती कडू यांच्यासह आदी मान्यवर या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते. वादळवाराच्या वेबसाईटवर नियमित रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच नवी मुंबई परिसरातील घडामोडींचा समावेश असणार आहे.