अलिबाग, दि.18 :- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाउनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने / आस्थापना सकाळी 6.00 ते 11.00 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.15 जुलै रात्री 12 वाजल्यापासून ते दि. 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजाविला हाेता. या काळात किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. घरपोच सेवा सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान पुरविण्यास परवानगी देण्यात आली हाेती.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!