पनवेल, दि. ०६ : पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा आज महापालिकेच्या सभागृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांच्या उपस्थितीत पार पडली. या महासभेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समिती सदस्य तसेच नामनिर्देशित सदस्यांची प्रमाणशीर प्रतिनिधित्व देऊन नियुक्ती करण्यात आली.
महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये प्रवीण काळुराम पाटील, मधु दौलतराव पाटील, समीर श्रीकांत कदम, बबन नामदेव मुकादम, रविंद्र अनंता भगत, विजय मनोहर खानावकर, हेमलता रवी गोवारी, रविंद्र गणपत जोशी, राजश्री महेंद्र वावेकर, मनोज कृष्णाजी भुजबळ, रुचिता गुरुनाथ लोंढे, अजय तुकाराम बहिरा, अरविंद पुंडलिक म्हात्रे, हरेश मनोहर केणी, तुषार परशुराम पाटील तसेच प्रिया सुनील गोवारी यांचा समावेश आहे.
तसेच महिला व बालकल्याण समितीवर १६ सदस्यांची निवड करण्यात आली असून
त्यामध्ये लीना नंदकुमार म्हात्रे, अनिता वासुदेव पाटील, सोनल अजिंक्य नवघरे, बायजा बबन बारगजे, प्रतिभा सुभाष भोईर, सरस्वती नरेश काथारा, शीला भाऊ भगत, कुसूम गणेश पाटील, अस्मिता जगदीश घरत, ममता प्रितम म्हात्रे, रुचिता गुरुनाथ लोंढे, प्रियांका तेजस कांडपिळे, योगिता समीर फडके, मनीषा अनंत म्हात्रे, अर्चना योगेश भोईर तसेच मेघना संदीप घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय महानगरपालिकेच्या महासभेत ७ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून
त्यामध्ये प्रथमेश चंद्रशेखर सोमण, प्रकाश पंढरीनाथ म्हात्रे, नितीन सोपान गावंड, परेश राम ठाकूर, गणेश चंद्रकांत कडू, डॉ.अरुणकुमार शंकर भगत, दिनेश रविंद्र खानावकर यांचा समावेश आहे.
सदर सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापौरांच्या मान्यतेने करण्यात आली.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!