अर्जाची छाननी 31 डिसेंबर तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी
चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी रोजी

पनवेल दि.30 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पनवेल सार्वत्रिक निवडणूक बुधवार, 15 जानेवारी 2026 रोजी होत आहे, तर मतमोजणी व निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा पहिला महत्त्वाचा टप्पा असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेला मंगळवार, 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली होती, तर आज दिनांक 30 डिसेंबर रोजी सांगता झाली. आजच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकुण 400 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
यामध्ये आज मंगळवार दिनांक 30 डिसेंबर शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालय
नावडे 1, प्रभाग 1, 2 आणि 3 रोजी एकूण 76 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले.
निवडणूक कार्यालय 02 अ खारघर , प्रभाग 4, 5, 6 येथे एकूण 52 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले .
निवडणूक कार्यालय 03 ब कळंबोली , प्रभाग 7, 8, 9,10 येथे एकूण 77 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले.
निवडणूक कार्यालय 04 क कामोठे, प्रभाग 11,12, 13 येथे एकूण 60 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले.
निवडणूक कार्यालय 05, ड पनवेल प्रभाग 14, 15, 16 येथे एकूण 52 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले
निवडणूक कार्यालय 06, ड पनवेल-2 प्रभाग 17,18, 19, 20 येथे एकूण 54 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले

आज एकूण सहा निवडणूक निणर्य अधिकारी कार्यालयातून 371 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. तसेच दिनांक 29 डिसेंबर रोजी एकुण 29 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. दोन दिवसात एकुण 400 पत्र प्राप्त झालेत.
नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी छाननीनंतर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार, 2 जानेवारी असून, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तर, शनिवार, 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!