पनवेल दि. १८ : पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी बबन नामदेव मुकादम यांची तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ममता प्रितम म्हात्रे यांची निवड विशेष सभेत करण्यात आली.
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे पार पडलेल्या या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे हे होते. पीठासीन अधिकाऱ्यांसह पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांच्या उपस्थितीत संबंधित समित्यांच्या सदस्यांमधून नियमानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.
दि. 17/03/2026 रोजी महापालिका सचिव यांचेकडे प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर निवड प्रक्रिया पार पडली. दोनही समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती सभापतीपदी बबन नामदेव मुकादम यांची तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ममता प्रितम म्हात्रे यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी अधिकारी रणजित यादव यांचेकडून करण्यात आली. एक वर्षासाठी ही निवड करण्यात आली आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!