पनवेल दि.२९: पनवेल कल्चरल सेंटर, सूर निरागस हो सांस्कृतिक विकास मंडळ आणि ज्येेष्ठ नागरिक संघ, पनवेल या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात दीपोत्सवी संगीत मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात ओमकार प्रभुघाटे यांनी ‘इंद्रायणी काठी.., ‘बगळ्यांची माळ फुले.., ‘गुंतता हृदय हे.., युवतीमना दारुण रण.. आणि श्रीरंगा कमलाकांता ही नाट्य-भक्ती-भावगीते दमदारपणेे सादर केली. तर संपदा माने यांनी ‘मी राधिका.., ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन.., ‘बोलावा विठ्ठल,.. ‘नरवर कृष्णासमान.., ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल.. ही नाट्यगीते, अभंग आणि चित्रपटगीते तयारीने सादर केली. याशिवाय या दोघांनी ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा.. हे अष्टविनायक चित्रपटातील युगलगीत आणि ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी.. हे देव दीनाघरी धावला या नाटकातलं वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं अतिशय लोकप्रिय नाट्यगीत गाऊन वन्स मोअर मिळविला. त्यांना तबला साथ केली ज्येष्ठ तबलावादक रामकृष्ण करंबेळकर यांनी, तर संवादिनी साथ केली वरद सोहनी या अतिशय गुणी व तयारीच्या संवादिनीवादकाने. तसेच पखवाज साथ सूरज गोंधळी आणि तालवाद्य साथ समीर कर्वे यांनी केली. हाऊसफुल गर्दीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या मध्यांंतरानंतर श्रोत्यांच्या आग्रहास्तव वरद सोहनीने हार्मोनियम सोलोही सादर केला. या कार्यक्रमाचं निवेदन दीपक पळसुले यांनी केलं.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!