कळंबोली दि.२४: अष्टविनायक क्षेत्र पाली येथील सिद्धी रविकांत घोसाळकर हिने एमबीएच्या परीक्षेत घवघवीत यश मिळून सुवर्ण गगन भरारी घेतली आहे. आई-वडिलांच्या समवेत सुधागड तालुक्याचे नाव तिने उज्वल केले आहे. पुणे येथील महाविद्यालयात फार्मसी मध्ये एमबीएच्या परीक्षेत घवघवीत यश मिळून तिने पालीचे नाव विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये उंचावले आहे. सिद्धीने मिळवलेल्या यशाबद्दल सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय ,सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
सिद्धी रविकांत घोसाळकर हीचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण नागोठणे येथील रिलायन्स पेट्रोल केमिकल च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून झाले. पुढील शिक्षण तिने पुणे येथील आय. एस. एम. एस. महाविद्यालयात पूर्ण केले व तेथेच मार्केटिंग आणि फार्मामध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. नुकत्याच लागलेल्या निकाला तिने एमबीएच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून कुटुंबीयांचे नाव उंचावले आहे. या महाविद्यालयामध्ये पदवीदान दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पदवीदान समारंभ पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी एकच जल्लोष करून आनंद उत्सव साजरा केला.