अलिबाग, दि.28 :- जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना करोनाची लागण झाली. जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी 716 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तपासणी अंती 615 नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
आतापर्यंत जिल्ह्यात 81 जणांना करोना लागण झाली असून आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 34 रुग्णांनी करोनाला हरवून माणसाची जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. या 34 करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे. दुर्देवाने 3 जणांचे जगण्याचे प्रयत्न असफल झाले.
जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत उपजिल्हा रुग्णालय पनवेल-25 (उत्तम), मुंबई फोर्टिज हॉस्पिटल मुलुंड- 3 (उत्तम),‌ सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई-2 (उत्तम), रिलायन्स रुग्णालय, नवी मुंबई-1 (उत्तम), जगजीवन रुग्णालय, मुंबई -1 (उत्तम), एम. जी. एम. रुग्णालय, कामोठे – 5 (उत्तम), वेदांत रुग्णालय ठाणे- 1 (उत्तम), फोर्टीज रुग्णालय, नवी मुंबई – 1 (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय-1 (उत्तम),भाभा रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम),भाटिया रुग्णालय,मुंबई- 1 (उत्तम), राजावाडी रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम), सायन रुग्णालय, मुंबई-1(उत्तम), अशा एकूण 44 करोना बाधित व्यक्तींचे विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत आणि त्यांची प्रकृती उत्तम असून तेही लवकरच पूर्ण बरे होऊन आपआपल्या घरी परततील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
याचा अर्थ करोनाचा प्रभाव कमी होत आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद यंत्रणा, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि रायगडकर जनता या सर्वांच्या एकजुटीतून जिल्ह्यात करोना विरुद्धची लढाई यशस्वी होईल, त्यामुळे नागरिकांनी बऱ्या होणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवावा, शासनाकडून ज्या सूचना देण्यात येत आहेत त्यांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!