पनवेल दि.14: भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड महिला मोर्चाच्यावतीने रविवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ०३ वाजता खारघर येथे ‘मिलेट पाककला स्पर्धा व मार्गदर्शन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयटीएम कॉलेज येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची उपस्थिती लाभणार आहे.
           कोणत्याही पदार्थाची चव ही तो पदार्थ बनविणाऱ्याच्या हाताची असते, हे जितके खरे तितकेच हेही खरे की पदार्थ बनविणाऱ्याच्या मनातून ती चव पदार्थात उतरते. पदार्थाची चव ही करणाऱ्याच्या मनाचे प्रतिबिंबच असते. पाककला म्हणजे रुचकर, चविष्ट आणि पोषक पदार्थ बनविण्याची कला किंवा शास्त्र आहे. ही कला जमायला या कलेची गोडी लागायला हवी त्याचा ध्यास घ्यायला हवा कारण कोणताच पदार्थ एकदा करून त्यात प्राविण्य मिळवता येत नाही. तो जेव्हा पुन्हा पुन्हा केला जातो त्याचवेळी त्यातले बारकावे लक्षात येतात आणि मगच तो प्रत्येकवेळी उत्तमोत्तम बनत जातो. त्या अनुषंगाने या पाककला स्पर्धेचे आणि विष्णू मनोहर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 
             या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आयोजक संध्या शारबिद्रे (९९८७८५१४८४) किंवा साधना पवार (७०२१५०१००८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!