पनवेल दि.२२: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मल्हार रोजगार तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्टिट्यूट, डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज देवद येथे झालेल्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल ६९१ जणांना ऑन दि स्पॉट नोकरी मिळाली. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर, आदर्श ग्रुप समूहाचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, चेअरमन धनराज विसपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नगरसेवक तेजस कांडपिळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, विश्वस्त विजय सोनार, वंदना सोनार, प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. देवद येथील डी. डी. विसपुते कॉलेजमध्ये झालेल्या या जॉब फेअरमध्ये विविध ४० कंपन्यांच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. या मेळाव्याचा २१८२ जणांनी लाभ घेतला. त्यामधून ६९१ जणांना नोकरी मिळाली. तर ३७८ जणांची पुनर्मुलाखतीसाठी निवड झाली आहे. जास्तीत जास्त युवा युवतींना नोकरीची संधी देण्याचे काम भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मल्हार रोजगार उपक्रमातून दिले जात आहे. या वर्षीचा हा पहिला रोजगार मेळावा मल्हार रोजगार व आदर्श ग्रुप ऑफ इन्टिट्यूट, डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मेळावा यशस्वी करण्यासाठी सागर माने, आनंद चव्हाण, विशाल ठोकळ, श्रुती गायकवाड, अवनी सुळे तसेच आदर्श समूहाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!