पनवेल दि.२०: उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रात नितीन पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. नगरसेवक व पनवेल शहर भाजपचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नितीन पाटील यांचे शनिवारी पनवेल येथे भाजपच्या तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, दक्षिण रायगड युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग, शहर सरचिटणीस अमरिश मोकल आदी उपस्थित होते.
उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील, कामोठे मंडल सरचिटणीस विजय चिपळेकर, पनवेल ग्रामीण संपर्क प्रमुखपदी राजेश गायकर यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट आशिर्वाद घेतले.