पनवेल, दि.29 (संजय कदम) : राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा नुकतीच कर्नाटक (मँगलोर) येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दुहेरी विजेते पद पटकाविले आहे. त्यामध्ये पुरुष संघाने विजेतेपद तर महिला संघाने उपविजेतेपद पटकाविले आहे. यामध्ये पनवेलमधील दोन तरुण सुद्धा सहभागी झाले होते व ही पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
सदर स्पर्धेकरिता देशभरातून पुरुषांचे 32 संघ तर महिलांचे 29 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सहभाग घेवून पुरुष गटाचे विजेतेपद पटकाविले तर महिला गटाने उपविजेतेपद पटकाविले आहे. या महाराष्ट्र संघात रायगडमधील 6 मुले व 5 मुलींचा समावेश होता. त्यामध्ये वरद शिंपी, विक्रम जयस्वाल, आर्यन पाटील, सर्वेश पाटील, मितांशु करपे, करमनसिंग हुंडल ही रायगडमधील सहा मुले तर तिथी प्रामाणिक, श्रावणी दिवेकर, आरती पाटील, लास्या राव व साईवी भोसले या पाच मुलींचा सहभाग होता. यातील साईवी भोसले हिला स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. या त्यांच्या यशाबद्दल रायगडसह पनवेलकरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

🔸”जागा कमी पडत असल्याने मॉलचा लवकरच विस्तार” – मंगेश परुळेकर
🛑Orion Mall’s 9th Anniversary

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!