पनवेल २७: उलवे नोड येथे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या नमो चषक २०२५ अंतर्गत खो खो स्पर्धेच्या खुल्या पुरुष गटात
आशीर्वाद अ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या गटात
आशीर्वाद ऍग्नेल्स कामोठे संघाने तर मुलींच्या गटात जिल्हा प्रशिक्षण केंद्र पनवेलने विजेतेपद पटकाविले.तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या गटात जय हनुमान स्पोर्टस क्लब पनवेलने व मुलींच्या गटात पनवेल जिल्हा प्रशिक्षण केंद्र संघाने विजेतेपद पटकाविले. यावेळी अनेक सामने चुरशीची झाले आणि त्याचा आनंद क्रीडा रसिकांनी घेतला तसेच खेळाडूंना उत्स्फूर्त दादसुद्धा दिली.
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य स्वरूपात आणि उत्तम आयोजनात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेलवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व या स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. पारंपरिक भारतीय खेळ असलेल्या खो खो खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते, हा खेळ खेळताना शरीराच्या सर्व भागांचा समावेश होतो. त्यामुळे शरीरासाठी उत्तम व्यायाम होत असलेल्या या मैदानी खेळाचे क्रीडा क्षेत्रात अनन्य साधारण महत्व आहे. तसेच खो खो खेळाने सामाजिक एकोपा, अखंडत्व वाढीस लागते. खेळाडूंमध्ये नेतृत्वगुण, खिलाडीवृत्ती, संघ भावना वाढीस लागते. त्यामुळे नमो चषकात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव, कबड्डी, इतर खेळांसोबत खो- खो स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
पुरुषांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक, आशीर्वाद सी संघाने तृतीय तर फिनिक्स संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. यामध्ये बेस्ट अटॅकर ओंकार हडबव्व, बेस्ट बॅट्समन विघ्नेश पाटील, बेस्ट पोल सुजल वाघ, बेस्ट डाईव्ह सौरभ, बेस्ट प्लेअर आदित्य थुबे हे ठरले.
महिलांच्या खुल्या गटात पनवेल जिल्हा प्रशिक्षण केंद्राने द्वितीय, महात्मा फुले महाविद्यालयाने तृतीय तर चतुर्थ क्रमांक ब्रुडर्स स्पोर्टस कळंबोली संघाने मिळवले. यामध्ये बेस्ट अटॅकर निहारिका मुंडे, बेस्ट बॅट्समन वैष्णवी खर्जे, बेस्ट पोल मुक्ती, बेस्ट डाईव्ह प्रज्ञा गाडे, बेस्ट प्लेअर संजिवनी जगदाळे ठरल्या. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक, फिनिक्स स्पोर्टस क्लब पनवेल तृतीय तर चतुर्थ क्रमांक ब्रुडर्स स्पोर्टस कळंबोलीने, मुलींच्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय, महात्मा फुले महाविद्यालय पनवेलने तृतीय, ब्रुडर्स स्पोर्टस कळंबोली संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविले. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात ब्रुडर्स स्पोर्टस (अ) कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक ब्रुडर्स स्पोर्टस (ब ), तर चतुर्थ क्रमांक जिल्हा प्रशिक्षण केंद्र पनवेल संघाने, मुलींच्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय, पीपीएम स्कूल वेश्वी तृतीय, तर जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल शाळा उरणने चतुर्थ क्रमांक पटकाविले.
असे होते बक्षिसांचे स्वरूप – पुरुष खुला गट –
प्रथम क्रमांक १२ हजार रुपये
द्वितीय क्रमांक १० हजार रुपये
तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ०७ हजार रुपये
उत्कृष्ट खेळाडू १५०० रुपये तसेच बेस्ट डिफेंडर, बेस्ट अटॅकर, बेस्ट पोल आणि बेस्ट डाईव्ह यांना प्रत्येकी ०१ हजार रुपये
महिला खुला गट-
प्रथम क्रमांक १० हजार रुपये
द्वितीय क्रमांक ०७ हजार रुपये
तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ०५ हजार रुपये
उत्कृष्ट खेळाडू १५०० रुपये तसेच बेस्ट डिफेंडर, बेस्ट अटॅकर, बेस्ट पोल आणि बेस्ट डाईव्ह यांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.
१७ वर्ष खालील गट – (मुले)
प्रथम क्रमांक १० हजार रुपये
द्वितीय क्रमांक ०७ हजार रुपये
तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ०५ हजार रुपये
उत्कृष्ट खेळाडू ०१ हजार रुपये तसेच बेस्ट डिफेंडर, बेस्ट अटॅकर, बेस्ट पोल आणि बेस्ट डाईव्ह यांना प्रत्येकी ७०० रुपये.
१७ वर्ष खालील गट – (मुली)
प्रथम क्रमांक ०७ हजार रुपये
द्वितीय क्रमांक ०५ हजार रुपये
तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ०४ हजार रुपये
उत्कृष्ट खेळाडू ०१ हजार रुपये तसेच बेस्ट डिफेंडर, बेस्ट अटॅकर, बेस्ट पोल आणि बेस्ट डाईव्ह यांना प्रत्येकी ७०० रुपये.
१४ वर्ष खालील गट – (मुले)
प्रथम क्रमांक ०७ हजार रुपये
द्वितीय क्रमांक ०५ हजार रुपये
तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ०३ हजार रुपये
उत्कृष्ट खेळाडू ७०० रुपये तसेच बेस्ट डिफेंडर, बेस्ट अटॅकर, बेस्ट पोल आणि बेस्ट डाईव्ह यांना प्रत्येकी ५०० रुपये.
१४ वर्ष खालील गट – (मुली)
प्रथम क्रमांक ०५ हजार रुपये
द्वितीय क्रमांक ०४ हजार रुपये
तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ०३ हजार रुपये
उत्कृष्ट खेळाडू ७०० रुपये तसेच बेस्ट डिफेंडर, बेस्ट अटॅकर, बेस्ट पोल आणि बेस्ट डाईव्ह यांना प्रत्येकी ५०० रुपये.