मुंबई दि.०३: शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ओडिशा येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. दोन पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या भीषण टक्कर झाल्याने १० हून अधिक बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात आतापर्यंत अंदाजे २३७ जणांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिकजण जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच, ओडिशामध्येही एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज होणारा वंदे भारत एक्स्प्रेस लोकार्पणाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!