मुंबई दि. 2 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पनवेल तालुक्याचा दहावीचा निकाल ९६.५३ टक्के लागला असून तालुक्यातील १२४ शाळांमधून यंदा दहावीच्या परिक्षेसाठी ११ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ हजार ९६७ विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यापैकी ११ हजार ५५२ विद्यार्थी पास झाले. पास झालेल्या ११ हजार ५५२ विद्यार्थ्यांमध्ये ५ हजार ९७३ मुले आणि ५ हजार ५७९ मुली आहेत. मुलींची पास होण्याची आकडेवारी जास्त असून ९७.६३ टक्के इतकी आहे.
दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 41 हजार 666 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 29 हजार 096 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 93.83 अशी आहे, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 60.90 अशी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

तालुकानिहाय टक्केवारी :
माणगाव 96.87, पनवेल 96.53, पोलापूर 96.02, म्हसळा 95.92, महाड 95.88, अलिबाग 95.30, श्रीवर्धन 95.08, उरण 94.73, रोहा 94.53, पेण 93.90, कर्जत 93.73, तळा 97.15, सुधागड 93.37, मुरूड 92.88, खालापूर 92.49.

मुलींची आघाडी :
सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.87 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.05 इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.82 टक्क्यांनी जास्त आहे.

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी :
राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 98.11 टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92.05 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 95.64, औरंगाबाद विभागात 93.23, मुंबई विभागात 93.66, कोल्हापूर विभागात 96.73, अमरावती विभागात 93.22, नाशिक विभागात 92.22 आणि लातूर विभागात 92.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!