पनवेल दि.30: कोरोनाच्या संकटकाळात जनतेचा आधारवड म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणारे भाजप नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबतीने सेवारूपी यज्ञ अखंडपणे धगधगत ठेवला आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजूंना त्यांनी मदत केली असून, आगामी काळातही सहकार्याचा ओघ सुरू राहणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस यंदा आरोग्यदायी असणार आहे. यानिमित्त पनवेल परिसरात ८० हजार मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये. त्याऐवजी फोनवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे.
कोविड-१९ संकटात आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकार्‍यांनी सर्वप्रथम जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप गोरगरिबांना सुरू केले. तांदूळ, डाळ, साखर, तेल, कांदे-बटाटे, पीठ यांचा समावेश होता. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि टीआयपीएलच्या माध्यमातून पनवेल शहर व तालुक्यात ३५ हजार सर्वसामान्य कुटुंबांनी त्याचा लाभ घेतला आहे. याशिवाय भाजप कामोठे मंडलतर्फे २२००, कळंबोली मंडलतर्फे २५७५, खारघर मंडलतर्फे १५ हजार, तर शेजारील उरणमध्येही २२ हजारांहून अधिक कुटुंबांनी जीवनावश्यक अन्नधान्याचा लाभ घेतला आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपच्या वतीने पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे यांसारख्या ठिकाणी मोदी भोजन कम्युनिटी किचन नावाने अन्नछत्र सुरू करण्यात आले. तेथे दररोज तीन ते चार हजार नागरिकांना चांगल्या प्रतीचे जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते या उपक्रमात सहभाग घेऊन सेवा बजावत आहेत. याद्वारे आतापर्यंत ०१ लाख २२ हजार जणांना अन्नदान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपची ही सेवा पाहून काही नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत आपलेही योगदान दिले. खारघर, कळंबोली येथे आजही अन्नवाटप चालू आहे.
सद्यस्थितीत अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही उणीव भरून काढण्याचा संकल्प आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या तरुण कार्यकर्त्यांनी केला. युवा मोर्चाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोशल डिस्टन्सिंग पाळत मोठ्या प्रमाणात रक्तदान करून विशेषत: टाटा कॅन्सर रुग्णालय रक्तपेढी, एमजीएम व रोटरी, खांदा कॉलनी येथील रक्तपेढ्यांना रक्ताचा पुरवठा केला. त्याचप्रमाणे आता नव्याने एक हजार बाटल्या रक्त संकलित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. इतरही उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजी घेत भाजप नगरसेवकांकडून प्रभाग निर्जंतूक करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर अर्सैनिक अल्बम-३० या रोगप्रतिकारकशक्ती वाढविणार्‍या गोळ्या तसेच सॅनिटायझर आणि मास्क यांचे मोफत वाटप केले जात आहे. आतापर्यंत भाजप पनवेल शहर मंडल अंतर्गत येणार्‍या प्रभागांतील स्थानिक नगरसेवकांकडून ५० हजार ८००, कळंबोली मंडल ८५००, कामोठे मंडल १० हजार आणि खारघर मंडलतर्फे ९२०० अशा एकूण ७८ हजार ५०० बॉटल्सचे वाटप करण्यात आलेले आहे. सॅनिटायझरचे कामोठे मंडलमध्ये २०० बॉटल्स, कळंबोली मंडल १८० लिटर आणि खारघर मंडलमध्ये ३२५ लिटर वितरण झाले, तर मास्क कामोठे मंडल ८००, कळंबोली मंडल ३००० आणि खारघर मंडलमध्ये १५०० नागरिकांना देण्यात आले. उरण मतदारसंघातही पक्षाच्या माध्यमातून १५०० हून अधिक मास्क आणि सॅनिटायझरच्या बॉटल्स देऊन नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्नकरण्यात आला.
कोरोना उपचारात आवश्यक असणारे पीपीई कीट खरेदी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आमदार निधीमार्फत विशेष बाब म्हणून पनवेल महानगरपालिकेला ५० लाख रुपये प्रस्तावित केले आहेत, तर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीला देऊन अडचणीच्या काळात पनवेल महापालिकेला सहकार्य केले आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी जनतेला हरप्रकारे मदतीचा हात देत आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून सेवेचे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्याचवेळी कोरोनापासून दूर राहण्यासाठी स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या, घरी रहा-सुरक्षित रहा, असा आपुलकीचे आवाहनही ठाकूर परिवार आणि भाजपकडून करण्यात येत आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!