पनवेल दि.११ : अॅक्सेस टू डायबिटीस एज्युकेशन या घोषवाक्याखाली रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायजन च्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन कऱण्यात आल्याची माहिती डॉ गणेश हांडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी त्यांच्या सोबत स्वप्नील गांधी, ईशा शिंदे, अभिजित सावळेकर, विनीत परमार, दीपक परमार आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना डॉ गणेश हांडे यांनी सांगितले की, आपण जाणताच की 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ ही संस्था डायबिटीस विषयी काम करत असताना “अॅक्सेस टू डायबिटीस एज्युकेशन” या घोषवाक्याखाली विविध कार्यक्रम राबवते. आपणही त्याचा संदर्भ घेऊन मधुमेहा विषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत रोटरी क्लब पनवेल होरायझन मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे आणि विविध सामाजिक कामांमध्ये अग्रेसर आहे. त्यामध्ये आरोग्य या संदर्भात रोटरीने आतापर्यंत खूप उपक्रम राबवले आहेत. मधुमेहाविषयी जनजागृती हा त्यातलाच एक भाग. डायबिटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ही मागील सहा वर्षापासून कार्यरत आहे आणि मधुमेहाविषयी जनजागृती, ठिकठिकाणी मधुमेह निदान शिबिरे, मधुमेहाच्या दुष्परिणामांचे माहिती देणारी शिबिरे या ट्रस्टने आयोजित केली आहेत. आतापर्यंत 15000 पेक्षा जास्त रुग्णांना डायबिटीसच्या साठी स्क्रीनिंग केलेले आहे. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून 13 नोव्हेंबर 2022 रविवार रोजी या दोन्हीही सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन मॅरेथॉन नवीन पनवेल डी मार्ट समोरील मैदानात आयोजित केली आहे. ही मेरेथॉन दोन गटात होणार आहे. सदर मॅरेथान आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे लोकांना डायबिटीस बद्दल कुतूहल निर्माण व्हायला हवं आणि तो टाळता कसा आला पाहिजे याचही ज्ञान त्यांना मिळेल. मधुमेह निवारण करत असताना व्यायामाला खूप महत्त्व आहे हा संदेश आम्हाला लोकांपर्यत पोहोचवायचा आहे आणि हाच या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश आहे मधुमेहाचे मुख्य दोन प्रकार असतात, टाईप वन आणि टाईप टू. टाईप वन डायबिटीस हा अत्यंत लहान वयामध्ये होतो ज्यामध्ये शरीरातली इन्सुलिन बनण्याची प्रक्रियाच थांबलेली असते. टाईप टू हा साधारणपणे तिशीनंतर येणारा डायबिटीस ज्यामध्ये शरीरातले इन्सुलिन काम करणे बंद होऊ लागते ज्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात. यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन असतं पण ते नीट काम करत नाही म्हणून साखरेचे प्रमाण वाढत जातं. टाईप वन डायबिटीस चे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळतात. 95 टक्के पेक्षा जास्त डायबिटीस रुग्ण टाईप टू चे आहेत. डायबिटीसची ट्रीटमेंट घेत असताना बऱ्याचशा लोकांना इन्सुलिनची गरज पडते. टाईप वन डायबिटीस चे रुग्ण इन्सुलिन शिवाय जगू शकत नाहीत आणि टाईप टू डायबिटीसच्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांना उपचार चालू असताना कधी ना कधी इन्सुलिनची गरज पडते परंतु आर्थिक परिस्थिती कधी कधी इन्सुलिन घेता येत नाही यासाठी कारणीभूत ठरते अशा वेळेस उपचार अपूर्ण राहून जातात आणि अशा वेळेस ते जीवावरही बेतते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे जर उपचारा मध्ये अडथळे येत असतील तर ही समस्या खूप मोठी आहे आणि ही समस्या दूर करण्यासाठी डायबिटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने इन्सुलिन बॅक नावाचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. यामध्ये इन्सुलिन गरजू लोकांना रेशनिंग सारख्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे ज्या पेशंटला तीन महिन्याचे इन्सुलिन, किती लागते, ते इन्सुलिन त्या पेशंटला दिले जाईल. इन्सुलिन स्टोर करण्यासाठी लागणार फ्रिज हे संस्थेकडे असेल आणि ते व्यवस्थित वितरण करण्याची व्यवस्था आहे संस्थेने डेव्हलप केलेली आहे. अजून इन्सुलिन बॅक हा प्रोजेक्ट सुरू झालेला नाही तरीपण या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या गोष्टी जमा करण्याचे काम सुरु आहे तसेच इन्सुलिन स्टोअर बनण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता लागते त्यासाठी विविध सामाजिक संस्थांना आम्ही आव्हान केलेले आहे जेणेकरून आर्थिक पाठबळ उपलब्ध झाल्यानंतर इन्सुलिन बैंक ची सुरुवात करता येऊ शकते आणि डायबिटीस हेल्थ फाउंडेशन त्याच्यासाठी पूर्ण तयारीत आहे रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि रोटर क्लब पनवेल होरायझन या संस्था या कामी मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत सामाजिक कार्यामध्ये रोटरीचा हातभार हा नेहमीच असतो या कामासाठी ही रोटरीचा हातभार आम्हाला लागू शकतो. तसेच मॅरेथॉन रन च्या दिवशी आम्ही लोकांना डोनेशन साठी आवाहन केलेले आहे डोनेशन मधून येणाऱ्या रकमेचा उपयोग डायबिटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टकडून इन्सुलिन बँक उभारणीसाठी केला जाईल. 13 नोव्हेंबर 2022 रविवार या दिवशी सकाळी साडेसहा वाजता मॅरेथॉन ची सुरुवात होईल या मॅरेथॉनचे ध्वजांकन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होईल या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहतील तसेच मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर मॅरेथॉन मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते होईल.