अलिबाग, दि.11:- संचालक, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या पत्रान्वये सन 2021-22 “स्वच्छ विद्यालय पुरस्कार” राष्ट्रीय स्तरासाठी रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर या शाळेची निवड झाल्याचे कळविले आहे. या स्वच्छ विद्यालय पुरस्काराचा कार्यक्रम केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दि.19 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी दिली आहे.
हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने गुरुवार, दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांच्या हस्ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर या शाळेचे प्राचार्य व त्यांचे सहकारी शिक्षकांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात आला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!