पनवेल दि.९: भारतातील अग्रगण्य एसयूव्हीनिर्माती कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज एक्सयूव्ही ७एक्सO या आपल्या प्रीमियम एसयूव्हीश्रेणीतील आगामी महत्त्वाच्या सादर करत असलेल्या एसयूव्हीचे नाव जाहीर केले. केवळ चार वर्षांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत तीन लाखपेक्षा जास्त जणांनी एक्सयूव्ही ७०० एसयूव्ही खरेदी केल्यामुळे कंपनीने भारतातील एसयूव्ही विभागात जोरदार मुसंडी मारली. ज्यामुळे एक्सयूव्ही ७०० एक गेमचेंजर ठरली त्या एक्सयूव्ही ७०० च्या या समृद्ध परंपरेवर आधारित एक्सयूव्ही ७एक्सO त्या सर्व बाबींची उंची अधिक वाढवत नेत आहे.
प्रेरणा आणि उत्साह निर्माण करणारे डिझाईन आणि अभियांत्रिकी असलेल्या या एसयूव्ही मध्ये एक्सयूव्ही ७०० च्या सिद्धहस्त सामर्थ्यासह उत्तम डिझाईन, तंत्रज्ञान, आराम आणि कामगिरी यांची जोड आहे. यामुळे केवळ काही बदल केलेली नाही तर खरोखरच अतुलनीय एसयूव्ही सादर केली जात आहे. प्रीमियम एसयूव्हीक्षेत्रातीलमहिंद्राच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देण्यासाठी डिझाइन केलेली एक्सयूव्ही ७एक्सO उद्याच्या एसयूव्हीसाठी पुन्हा एकदा मार्गदर्शक ठरण्यास सज्ज आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!