पनवेल दि.०९: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून, पनवेल येथील मेल मोटर डेपो (डाक विभाग) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘All India Postal SC/ST Employees Welfare Association’ च्या वतीने “Blood for Ambedkar” या वेगळ्या आणि सामाजिक संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मेल मोटर सेवा, मुंबईचे वरिष्ठ व्यवस्थापक हेमंतकुमार सिंग हे विशेष निमंत्रक म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ‘All India Postal SC/ST Employees Welfare Association’ चे सर्कल सचिव जयराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांना केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीने आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४० स्वयंसेवकांनी उत्साहाने रक्तदान केले. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरली. “Blood for Ambedkar” या संकल्पनेद्वारे डॉ. बाबासाहेबांचे मानवतावादी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला, ज्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!