अलिबाग दि.२०: रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निधी चौधरी यांची मुंबईतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. तर 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे रायगडचे नवीन जिल्हाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.