निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची अध्यक्षपदी तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची सरचिटणीसपदी निवड
अलिबाग,दि.25 :- रायगड जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील राजपत्रित वर्ग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांची ओळख तसेच महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीचे पुनर्गठन या संदर्भातील महत्वाची बैठक सोमवार, दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांच्या अध्यतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची अध्यक्षपदी तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी मुख्यालय सह सरचिटणीस सुदाम टाव्हरे, संघटक रमेश जंजाळ, बापूसाहेब सोनवणे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जाहीर करण्यात आलेली रायगड जिल्हा कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे :-
अध्यक्ष- निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, सरचिटणीस- जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप.
उपाध्यक्ष- जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, उपायुक्त, पशुसंवर्धन डॉ.सुभाष म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग अलिबाग जगदीश सुखदेवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद भगवान घाडगे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, कार्यकारी अभियंता, सा.बा.वि.महाड आर.के.बामणे, कामगार उपायुक्त प्रदीप पवार.
कार्याध्यक्ष- उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जि.प.रायगड निलेश घुले,
सह कार्याध्यक्ष- जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम,
कोषाध्यक्ष- डॉ.मनोजकुमार श्रेणिक शेट्ये, सह कोषाध्यक्ष- विकास बाबासाहेब खोळपे.
सहसरचिटणीस – जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण शशिकांत तिरसे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग, सचिन इंगळी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, अमित शेगडे, प्रशांत ढगे, राहुल मुंडके, विठ्ठल इनामदार, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, विजय तळेकर, मुख्याधिकारी कर्जत पंकज पाटील, पेण नगर परिषद मुख्याधिकारी जीवन पाटील, अलिबाग मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र राम राठोड,
कार्यकारणी सदस्य- जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग, जि.प.रायगड डॉ.ज्ञानदा फणसे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग प्रदीप जगताप, उपअधीक्षक भूमी अभिलेख पनवेल विजय भालेराव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर, गटविकास अधिकारी पनवेल संजय भोईर, सहाय्यक उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र बालाजी बी.चव्हाण, सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन शेख, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.विष्णू काळे, सहजिल्हा निबंधक शैलेंद्र साटम, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय सुरेश भारती, सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू काळे, तहसिलदार सतीश कदम, सुरेश काशिद, विक्रम देशमुख, भाऊसाहेब अंधारे, दिलीप रायण्णावार, सचिन गोसावी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अरुण पवार, गटविकास अधिकारी संजय भोईर.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!