अलिबाग दि.२७: दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 96.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 913 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 727 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. यामधील 34 हजार 568 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक हजार 159 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 1.47 टक्के जास्त निकाल लागला आहे.
तालुकानिहाय निकाल (टक्क्यांमध्ये)
पनवेल 97.76, माणगाव 97.68, महाड 97.58, म्हसळा 97.56, पोलादपूर 96.94, अलिबाग 96.81, पेण 96.69, उरण 96.56, रोहा 96.54, श्रीवर्धन 96.29, मुरूड 95.99, कर्जत 94.97, खालापूर व तळा प्रत्येकी 94.54, सुधागड 92.59.