पनवेल दि.९: न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील न्हावे येथे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू नये, या करीता सर्वसामान्यांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्व:खर्चातून पाण्याची टाकी उभारण्या करीता आर्थिक मदत केली आहे. त्यानुसार या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आज (गुरुवारी) झाले.
रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून न्हावे येथे ग्रामस्थांच्या सोई करीता जलकुंभ अर्थात पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ३० लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर गुरुवारी या पाण्याच्या टाकीचा भुमीपूजन सोहळा पार पडला. या पाण्याच्या टाकीसाठी नंदकिशोर भोईर आणि नितीन भोईर यांनी जागा दिली आहे. या भुमीपूजनावेळी भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच मंजुषा ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत,ज्येष्ठ कार्यकर्ते सी. एल. ठाकूर, सदस्य सागर ठाकूर, देवेंद्र भोईर, अमृता पाटील, कल्पना घरत, निर्मला ठाकूर, जयवंत देशमुख, सुधिर ठाकूर, किशोर पाटील, माजी उपसरपंच साधना तांडेल, आशिष पाटील, रवींद्र पाटील, उत्तम म्हात्रे, गाव अध्यक्ष शैलेश पाटील, महिला मंडळ अध्यक्षा मिनाक्षी पाटील, संजय ठाकूर, सी. एल. ठाकूर, किसन पाटील, नितीन भोईर, नंदकिशोर भोईर, रंजना घरत, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी अरुणशेठ भगत यांनी सांगीतले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रुपाने सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यसाठी सर्वतोपरी मदत कराणार नेता आपलयाला मिळाला आहे असे प्रतिपादन केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!