मुंबई दि.15: कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान करून बुधवारी सन्मानित करण्यात आले. या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसेच आयोजक ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे उपस्थित होते. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. सोबत जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर,अमोघ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.