कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेच्या करारनाम्याची हॅट्रिक !
एकाच दिवसात तिन कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार

पनवेल दि.८: रायगड व नवीमुंबई मधील कामगारांना न्याय देणारी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना हि एकमेव संघटना होय. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करणारे कामगार नेते हे आपल्या नेतृत्व कौशल्याने गेली ३७ वर्ष कामगारांना न्याय देत आहेत.
आज शेलघर येथील कार्यालयात तीन कंपन्यांतील कामगारांच्या पगारवाढीचे करार करण्यात आले. मे. सुरज अॅग्रो इन्फ्रा. प्रा. ली.जे. एन. पी. टी उरण या कंपनीतील कामगारांसाठी तीन वर्षासाठी १६००० रुपये पगारवाढ करण्यात आली. त्याचबरोबर एक बेसिक पगार कामगारांच्या परिवारासाठी मेडिक्लेम पॉलीसीसाठी तसेच १४% बोनस देण्याचे मान्य करण्यात आले आहे. तर तळोजा येथील सवेरा इंडिया रायडींग सिस्टीम या कंपनीतील कामगारांसाठी ९२०० रुपयंची पगारवाढ, ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलीसी व एक ग्रॉस पगार बोनस, 10 लाख रुपयांची टर्म इन्शुरन्स देण्याचे मान्य करण्यात आले. तिसरा करारनामा मे. किम केमिकल्स या कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीसाठी करण्यात आला. या करारनाम्यानुसार काममारांना तीन वर्षासाठी 6500 रुपये पगारवाढ तसेच एक ग्रॉस सॅलरी + 5000 प्रत्येकी बोनस देण्याचे मान्य करण्यात आले. यावेळी न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील उपस्थित होते. तर सुरज अॅग्रो कंपनीतर्फे बिझनेस हेड जयेश चौहान, जि. एम. ऑपरेशन सुशील कुराळे तसेच कामगार प्रतिनिधी अरुण पाटील, राकेश म्हात्रे, सौकत अली, किशोर पाटील आदि उपस्थित होते. सवेरा इंडिया तळोजा या कंपनीतर्फे ऑपरेशन मॅनेजर अजय पवार तर कामगार प्रतिनिधी संदीप म्हात्रे,रविंद्र जंगम, भरत बोडका, सुभाष तांडेल, हरी पाटील, आत्माराम पाटील, रोशन भोईर, विनोद बारसे, महेंद्र म्हात्रे, रामलाल पासवान आदि उपस्थित होते. किम केमिकल्स तळोजा कंपनीतर्फे मॅनेजिंग डायरेक्टर महेश चंदानी व कामगारांतर्फे सुनील पाटील, विश्वास भोईर,श्रीनाथ मढवी, सुभाष म्हात्रे आदि उपस्थित होते. एकाच दिवसात तीन कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढ करणारी न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना हि रायगड, नवीमुंबईतील एकमेव कामगार संघटना आहे.

🛑’मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन सरकारनं खूप अपेक्षा वाढविल्या आहेत’ l गझलकार – ए. के. शेख

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!