पनवेल, दि.9: पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा तसेच वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंगळवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या 264 कोटीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, सध्याचे सिडकोचे सह व्यवस्थापकिय संचालक व महापालिकेचे माजी आयुक्त गणेश देशमुख, आयुक्त मंगेश चितळे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेविका, शिवसेना शहर अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईच्या जीडीपीमध्ये एक टक्क्याची वाढ होणार आहे. यामध्ये पनवेल महापालिकेचे काम प्रभावी ठरले पाहिजे. पनवेल महापालिकेला देशातील, महाराष्ट्रातील सर्वात चांगली महापालिका बनविण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे.यामध्ये सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सिडकोचे सह व्यवस्थापकिय संचालक गणेश देशमुख म्हणाले महापालिेकेचे होणारे मुख्यालय हे अत्यंत सुंदर असून राज्यातील महत्वाच्या शासकीय इमारतीमधील सर्वांत उच्च् स्तरावरील इमारत म्हणून गणली जाणार आहे. तसेच महापौर निवासस्थान हे आजूबाजूच्या परिसरातील सर्वोकृष्ट इमारत असणार आहे. येत्या काळात महापालिकेच्या राहिलेल्या सर्व भूखंडाचे वितरण, सर्व सेवांचे हस्तांतरण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी देशमुख यांनी दिले. आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, आज जी विकासकामांची उद्घाटने झाली ती जीवनाच्या प्रत्येक घटकाला परिपूर्ण करणारी आहेत. महिला व बालकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने महापालिका कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खड्डे मुक्त शहर करण्यासाठी काम सुरू करणार आहे. तसेच यावेळी नागरिकांना ग्वाही देऊ इच्छितो सुशासक,गतिमान प्रशासन, पारदर्शक प्रशासन आणि उत्तरदायी प्रशासक होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरीक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांनी केले तसेच आभार प्रदर्शन उपायुक्त कैलास गावडे यांनी केले. या कार्यक्रमास महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिक्षक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान राज्य स्तर ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रिडा क्षेत्रात कामगिरी बजवलेल्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये टेबल टेनिसमधील शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त संजय सुदाम कडू, कबड्डी मधील शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त सुर्यकांत ठाकूर, रायफल शुटींगमधील शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त सिमा शिरूर, पेरू येथील ज्युनिअर वर्ल्ड रायफल शुटिंगमधील चॅम्पियनशिप2024 आंतराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता पार्थ माने,जकार्ता येथील रायफल शुटिंगमधील 15 वी एशियन चॅम्पियनशिप 2024 रौप्य पदक विजेती अन्वी विक्रम रोठोड यांचा यावेळी छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात काम महापालिकेने कमी मनुष्यबळाच्या जोरावर मोठे काम केले. याकाळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत महापालिकेने अत्यंत सक्षमतेने काम केले. या कामाचा लेखजोखा शब्दातीत केलेले गौतम कौतवाल लिखित ‘युध्द’ या कॉफी टेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
लोकार्पण सोहळा 1)पनवेल महानगरपालिकेचे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (UHWC) ठिकाण – आसूडगांव व इतर ३ ठिकाणे. 2) मोबाईल मेडीकल युनिट्स (फिरता दवाखाना) – एकूण २ वाहने. ३) वळवली येथील पनवेल महानगरपालिकेची प्राथमिक शाळा. 4) अग्निशमन वाहन 22 MTRTTL 1 वाहन, ॲडव्हान्स्ड रेस्क्यू व्हेईकल 1 वाहन, ॲडव्हान्स्ड फायर इंजिन 1 वाहन 5) पमपा हद्दीमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करण्यासाठी एकूण 1 वाहन. 6)रामकि ग्रुप यांचे सीएसआर निधीतून बहुउद्देशीय सभागृह 7)पनवेल महानगरपालिकेचे लोकनेते स्वर्गीय दि.बा पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल 8)धुळीचे प्रदुषण नियंत्रण ठेवणेकरिता एकुण 4 वाहने 9)फिरते वातावरणीय हवा गुणवत्ता मापक केंद्र 1 वाहन
भूमीपूजन 1)पनवेल महानगपालिका हद्दीमध्ये सुरक्षितेतच्या दृष्टीने एकुण 1343 अत्याधुनिक CCTV यंत्रणा कार्यन्वित करणे क्षमता असलेले हे वाहन फर्स्ट टर्नआऊट (Fire Respond) म्हणून वापरण्यात येणार आहे. २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत पनवेल महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी अ.भु.क्र.५०/९ येथे प्रस्तावित असलेल्या गृहप्रकल्प इमारतीचे व अनुषंगिक पायाभुत सुविधांचे बांधकाम करणे. 3)पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती क मधील लायन्स गार्डन ते तहसिल ऑफिस ते एचओसी कॉलनी पर्यंत रस्त्यांचे क्राँकीटीकरण करणे. 4) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर येथील सेक्टर १२ भुखंड क्रमांक १२ अ क्षेत्रफळ १४९१.०४ या ठिकाणी नव्याने दैनिक बाजार मच्छी मार्केट बांधकाम करणे. 5) बेघरांसाठी रात्र निवारा बांधकाम करणे – खांदा कॉलनी. 6) पनवेल महानगरपलिका हद्दीतील बल्लाळेश्वर मंदिर व रामेश्वर मंदिर येथे प्रवेशद्वार बांधणे व घाटाचे उन्नतीकरण करणे. 7) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर मिनी थिएटर बांधकाम करणे.
🔹पंतप्रधानांचा महाराष्ट्राच्या जनतेशी मराठीतून संवाद