पनवेल दि.२५: लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या कबड्डीच्या थरारात पुरुषांच्या खुल्या गटात भेंडखळच्या नवकिरण क्रीडा मंडळ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात कर्नाळा स्पोर्टस पनवेलने बाजी मारली. पुरुषांच्या गटात सीकेटी पनवेलने द्वितीय, गणेश क्लब उरणने तृतीय, तर चतुर्थ क्रमांक जय हनुमान जासई संघाने, महिलांच्या गटात पनवेल स्पोर्टस संघाने द्वितीय, सिकेटी महाविद्यालयाच्या संघानी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविले.
पुरुष गटात भेंडखळ संघाचा हर्ष घरत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला, उत्कृष्ट चढाई सीकेटीचा मिनेश कदम, पंकज म्हात्रे उत्कृष्ट पक्कड तर पब्लिक हिरो म्हणून जय हनुमान जासई संघाच्या प्रीतम आदिवासी या खेळाडूला मिळाला. महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्टसची तेजा सकपाळ सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. उत्कृष्ट चढाई खेळाडूचा मान पनवेल स्पोर्टसची रचना म्हात्रे, सीकेटी संघाची पुजा सुर्यकारने उत्कृष्ट पक्कड खेळाडू म्हणून बक्षीस पटकावले. या स्पर्धेतील अनेक सामने चित्तथरारक झाले. खेळामध्ये पकड, चढाई, संरक्षण आणि उत्साह झळकत होता. मात्र यामध्ये खिलाडूवृत्तीही अधोरेखित होत होती. त्यामुळे खेळ आणि खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेतून दिसत होता. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी प्रो- कबड्डीचा स्टार खेळाडू अस्लम इनामदार, सिद्धेश तटकरे, आमिर वाणी, संकेत सावंत यांच्यासह प्रो-कबड्डीच्या इतर खेळाडूंची तसेच सुप्रसिद्ध सूत्रसंचालक श्री. राणा यांचीही विशेष उपस्थिती होती.
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. या नमो चषक अंतर्गत २४ जानेवारीला प्रकाश झोतात खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा उत्स्फूर्तपणे आणि जल्लोषात पार पडली. या कबड्डी स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार अशोक मोहोळ, पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व नमो चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, भार्गव ठाकूर, विजय घरत, जयवंत देशमुख, सुहास ठाकूर, सुहास भगत, कबड्डी प्रशिक्षक सूर्यकांत ठाकूर, विनोद नाईक, विश्वनाथ पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, मिनाक्षी पाटील, योगिता भगत, निकिता खारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील पुरुष खुला गटातील विजेत्या संघास २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १५ हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ०७ हजार रुपये सर्वोत्कृष्ट खेळाडू १५०० रुपये तसेच इतर वैयक्तिक प्रकारात प्रत्येकी ०१ हजार रुपये तर महिला खुला गटातील विजेत्या संघाला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक १० हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ०५ हजार रुपये, सर्वोत्कृष्ट खेळाडू १५०० रुपये तसेच इतर वैयक्तिक प्रकारात प्रत्येकी ०१ हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!