नवी मुंबई, दि. 27: महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल/रायगड व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उरण (आयटीआय) आणि ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, बोकडविरा, उरण जि.रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.30 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.00 वा. ऑल कार्गो कौशल्य विकास केंद्र, बोकडविरा, सेक्टर-30, द्रोणागिरी नोड, के पॉईंट एच समोर, उरण जि.रायगड येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. सदर कंपन्यांना इ.10 वी, इ.12 वी, आयटीआय, पदवी, पदवीधर (सदर रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उद्योजकांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे. या मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देऊन नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच यापुर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारित संकेतस्थळावर आपला जुना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच जॉब फेअर टॅबवर क्लिक करून Rojgar Melava Panvel यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे ॲप्लाय करावे. तरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी व प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत प्रशिक्षित लाभार्थी/उमेदवार यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच मुलाखतीस येताना स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतिसह वरील ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, पनवेल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!