पनवेल दि. २ (संजय कदम) जालना येथील मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्लाचा आज सकल मराठा समाजाने पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्या जवळ एकत्रित येऊन शासनाचा निषेध केला व या लाठी हल्ल्याची जबाबदारी शासनाने स्वीकारून त्यानी त्वरित पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे.
यावेळी सकल मराठा समाज पनवेलचे विनोद साबळे, गणेश कडू ,रामेश्वर आंग्रे, यतीन देशमुख, अल्पेश माने, कमलाकर लबडे, राजश्री कदम, कालिदास देशमुख, संतोष जाधव, समाधान काशीद, सदानंद शिर्के, प्रवीण जाधव, कुणाल कुरघोडे, पराग मोहिते, आतिश साबळे, विकास वारदे, शिवाजी दांगट, सुधीर मोरे, सचिन भगत, अनिल जाधव यासह शेकडो मराठा समाज बांधव एकवटले होते. या प्रसंगी जमलेल्या शेकडो मराठा समाज बांधवानी शासनाच्या निषेधात्मक घोषणा सुद्धा दिल्या. यावेळी पोलिसांना त्यांच्या मागणीचे निवेदन सुद्धा देण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!