पनवेल दि.21: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदाचा योग दिन हा डिजीटल स्वरुपात साजरा केला गेला. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे सामूहिक कार्यक्रम यंदा झाले नाहीत. अनेक ठिकाणी नागरिक हे आपल्या घरातच योगा करुन योग दिनाच्या कार्यक्रमात सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोशल डिस्टीगचे पालन करून आंतर राष्ट्रीय योग दिन आज साजरा करण्यात आला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त नेहा चाफेकर यांनी योग करण्याच्या विविध प्रात्यक्षिके दाखिवली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी योगासन करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. ऑनलाईन प्रसारित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेत आपआपल्या घरीच राहून योगासने केली.