उरण दि 21(विठ्ठल ममताबादे) देशातील सर्वात मोठे प्रकल्प असलेल्या JNPT बंदरात सर्वांसाठी JNPT ने भव्य असे शॉपिंग सेंटर उभारले आहे परंतु कित्येक वर्षे झाली शॉपिंग सेंटर मधील ही व्यावसायिक गाळे(दुकाने)बंद असल्याने येथील स्थानिक भुमीपुत्र असलेल्या बेरोजगार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाल्याने सर्व सामान्यांचे खूप मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण 60 गाळे पैकि काही मोजकेच गाळे सुरु आहेत बाकिचे 40 ते 45 गाळे बंद आहेत त्यामुळे हे बंद असलेले गाळे उरण मधील स्थानिक भुमीपुत्र,अपंग, बचत गट, महिला मंडळ यांना चालवायला द्यावेत, करोनाच्या काळात बेरोजगांराना JNPT ने मदतीचा हात द्यावा अशी मागणी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी JNPT प्रशासनाकडे पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेट देउन केली आहे.
JNPT ची स्थापना होवून आज 30 वर्षे झाली JNPT ने प्रकल्पग्रस्त व कर्मचा-यांसाठी टॉउनशिपची उभारणी केली.कर्मचा-यांसोबत टॉउनशिप मध्ये JNPT अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच अनेक वरिष्ठ अधिका-यांची निवासस्थाने देखील आहेत. या सर्वांसाठी JNPT ने भव्य असे शॉपिंग सेंटर उभारले आहे. या शॉपिंग सेंटर मध्ये सर्व सुविधांनी युक्त असे 60 गाळे(दुकाने) असावित असे धोरण JNPT प्रशासनाचे होते. ताजी फळे, भाजी, अंडी, दर्जेदार किराणा सामान तसेच बँक, ATM, सलून, खाद्य पदार्थाची दुकाने यासाठी सुद्धा शॉपिंग सेंटर मध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु दुर्दैवाने आज 60 गाळे असलेले शॉपिंग सेंटर मधील सुमारे 40 ते 45 गाळे गेली कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहेत. दोन बँका व दोन दुकाने सोडली तर कुठल्याही प्रकारची व्यवस्था हया शॉपिंग सेंटर मध्ये नाही. त्यामुळे सुमारे 70% कर्मचा-यांनी आपली निवासस्थाने सोडून दूसरीकडे राहण्यासाठी गेले आहेत. राहीलेल्या कर्मचा-यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीसाठी उरण मध्ये जावे लागते. योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे व पात्रता नसलेल्या अधिका-यांकडे शॉपिंग सेंटरची व्यवस्था व जबाबदारी दिल्यामुळे आज ही बिकट परिस्थिती उदभवली आहे.
सध्या देशात तसेच महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. उरण तालुक्यातील हजारो तरुणांच्या नोक-या लॉकडाऊन मुळे गेल्या आहेत. बहुतेक सर्व CFS व खाजगी कंपनीचे कामकाज अर्ध्यावर आले आहे. तरि या सर्व परिस्थितिचा विचार करून उरण मधील सर्व स्थानिक भुमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांना लॉकडाऊनच्या काळात उभारी देण्यासाठी JNPT च्या शॉपिंग सेंटर मधील गाळे नाममात्र दराने चालवायला द्यावेत. यावेत यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त, अपंग व्यक्ति, महिला मंडळ, बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे अशीही मागणी यावेळी मनसेच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी JNPT प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी JNPT अध्यक्ष संजय सेठी, विद्यमान आमदार महेश बालदि, जिल्हाधिकारी रायगड, JNPT उपाध्यक्ष श्री वाघ तसेच दिनेश पाटिल(विश्वस्त JNPT), कॉमरेड भूषण पाटिल(JNPT विश्वस्त)यांना लेखी पत्रव्यवहार करून ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवट पर्यंत या विषयाचा पाठपुरावा करणार असून उरण तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधींनी या मागणीसाठी JNPT प्रशासनाकडे पाठपुरावा करावा जेणे करून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना याचा फायदा होईल असे मत अतुल भगत यांनी या निवेदनातून व्यक्त केला आहे.