मुंबई, दि.७: यंदा कोरोना संकटामुळे गणेशोत्सव, नवरात्र साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. परिणामी त्याच्या सुट्ट्या शाळांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी सतत ऑनलाईन क्लासेस मध्ये व्यस्त दिसले. मात्र आता दिवाळीची सुट्टी देखील कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. मात्र ही सुट्टी आता वाढविण्यात आली आहे.
विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या दिवाळीच्या सुटीच्या मागणीचा विचार करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पाच नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार 12 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी सुटी देण्यात आली होती, यात आता बदल करून 14 दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!