युवकांना जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची क्रेझ !
पनवेल दि.१५: रायगड जिल्ह्यातील सात विधानसभे पैकी काँग्रेस पक्षाला एकही जागेवर उमेदवारी नसतानाही रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्र घरत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून रसायनी येथील बीजेपी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. कालच महाविकास आघाडीची मोहपाडा येथे सभा सुरू असताना तेथील बीजेपी चे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला यातच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्व कौशल्याची चुणूक दिसुन येत आहे. कोणतेही पद नसताना सामाजिक, राजकीय, कला -क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना सढळ हस्ते आर्थिक व इतर पाठबळ देण्याचे काम ते करत आहेत त्याचमुळे एकमेव कामगार नेते महेंद्र घरत यांची क्रेझ युवा वर्गात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.