पनवेल दि.१५: कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुनानक जयंती साजरी केली जाते. यंदा हा सण १५ नोव्हेंबरला शुक्रवारी साजरी केला जाणार आहे. शीख धर्माच्या लोकांसाठी ही जयंती अधिक खास मानण्यात आली आहे.
गुरुनानक जयंती हा शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गुरुनानक जयंतीच्या दिवशी शीख समुदयातील लोक गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरुनानक देव यांच्या शिकवणीचे स्मरण करतात. म्हणून या दिवसाला गुरु पर्व आणि गुरु नानक प्रकाश उत्सव म्हणूनही ओळखले जाते.
गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, गुरुद्वारात अभिवादन केले तसेच शीख बांधवाना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस नितीन पाटील, ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, बबन मुकादम, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, आदी उपस्थित होते.