पनवेल दि.१३: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक घोटाळे बाहेर काढल्याने महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांवर कारवाई करणे अपेक्षित असताना उलट फडणवीस यांनाच सरकारने पोलिसांमार्फत नोटीस पाठवली. हा सर्व प्रकार बघता महाराष्ट्रातील जनता संतापली आहे. या नोटीसीची आज खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
या वेळी भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, नगरसेविका चारुशीला घरत, हेमलता म्हात्रे, भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, गोपीनाथ मुंडे, संजय जैन, श्रीनिवास कोडरू, मोतीलाल कोळी, भीमराव पोवार, महिला मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!