पनवेल दि.13: पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकार्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, पं. स. सदस्य रेखा म्हात्रे आदी उपस्थित होते.
या वेळी शेकापचे गजानन पाटील आणि त्यांचे सहकारी राजकुमार जितेकर, राहुल पाटील, दशरथ पाटील, जितेंद्र जितेकर, भरत कुडावकर, चिंतामण घोपरकर, मनीषा पाटील, सोनाली पाटील, धनश्री पाटील, सुषमा जितेकर, अरुणा जितेकर आदी असंख्य समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.