पनवेल दि.२२: शहराची परंपरा असलेली शोभायात्रा बुधवारी मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. गुढीपाडव्यानिमीत्त गेल्या २४ वर्षांपासून नववर्ष स्वागत समितीच्यावतीने गुढीपाडव्यानिमीत्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते. त्यानुसार यंदाच्यावर्षीही हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या यात्रेत रामरथ, लेझीम पथक, ढोल पथक, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसेच पारंपारीक वेषभूषा करुन पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेची सांगता श्रीराम नामाच्या गजराने झाली.
हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याकरीता नववर्ष स्वगत समितीच्या वतीने गुढी पाडव्यानिमीत्त भव्य शोभायात्रा पनवेलमध्ये काढण्यात येते. १९९८ पासून ही परंपरा अविरत सुरु असून यंदाचे हे या शोभायात्रेचे २४ वे वर्ष होते. या यात्रेला पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे गायत्रीमंत्राचे पठण करुन सुरुवात झाली. त्यानंतर श्री जाखमाता गावदेवी मंदिर, प्रभू आळी, जुने प्रांत ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज पथ, श्री विरुपाक्ष महादेव मंदिर, जय भारतनाका, लोकमान्य टिळक पथ असे मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात श्रीरामनामाच्या गजराने या शोभायात्रेची सांगता झाली. या यात्रेत महिला तसेच लहान चिमुकले पारंपारीक वेशभूषा करुन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच विविध संस्थांच्यावतीने शोभायात्रे दरम्यान सामाजिक विषयांसदर्भात जनजागृती करण्यात आणि तर विविध मंडळांच्यावतीने यात्रेमध्ये आलेल्या नागरीकांना पाणी, सरबताचे वाटप करण्यात आले. यामध्ये पनवेल महिला वकील वर्गाच्यावतीने बाईक रॅली, सिंधुदूर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल आणि युवानेते केदार भगत व मित्र मंडळाच्यावतीने सरबताचे वाटप, रुधीरसेतूच्यावतीने रक्तदान हेच श्रेष्ठदान या संदर्भात जनजागृती तसेच विविध संस्था आणि मंडळांच्या वतीने पथनाट्य, लाठीकाठीचे सादरीकरण करुन लक्ष वेधून घेण्यात आले. या यात्रेदरम्यान पनवेल शहर पोलिस ठाणे आणि वाहतुक शाखेच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, विक्रांत पाटील, प्रदिप सावंत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचीता लोंढे, नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष अमित ओझे, उपाध्यक्ष सुनिता खरे, सचिव अविनाश कोळी यांच्यासह विविध संस्था, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरीक मोठ्या सहभागी झाले होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!