कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थी
पनवेल दि.२१: सध्याची परिस्थीती पाहता कंपनीही चालली पाहिजे व कामगारही जगला पाहिजे यासाठी समन्वय साधून वाढलेली महागाई पाहता कामगारांचे जिवन सुकर व्हावे हा उद्देश ठेवून न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत हे कामगारांसाठी पगारवाढीचे करार करत असतात. संघटनेच्या माध्यमातून या वर्षीचा चौथा पगारवाढीचा मे. अपना लॉजिस्टीक्स (बाल्मर लॉरी भेंडखळ) या कंपनीतील कलमार ऑपरेटर्स व हेल्पर यांना ५५००/- रुपये पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना एक ग्रॉस सॅलरी बोनस तसेच २ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले.
या करारनाम्या प्रसंगी NMGKS संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, सरचिटणीस वैभव पाटील, संघटक अजित ठाकूर तर व्यवस्थापना तर्फे डायरेक्टर अनमोल मोदी, एच.आर. मॅनेजर वसंत ढोंगरे, ऑपरेशन मॅनेजर ब्रिजेश सिंग तर कामगार प्रतिनिधी अमोल ठाकूर, कल्पेश ठाकूर, संगप्पा घाडगे, रविंद्र पाटील आदि उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!