पनवेल दि.4 : पनवेल तालुक्यात आज १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पनवेल महापालिका हद्दीत ९ रुग्ण (कामोठे-५, खारघर-२, पनवेल शहर-१ आणि नवीन पनवेल-१) तर पनवेलच्या ग्रामीण भागात ७ रूग्ण (उलवे-४, विचुंबे-३) आढळले आहेत. अलिबाग, उरण येथे प्रत्येकी १-१ रुग्ण आढळून असून जिल्ह्यात एकूण १८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आजचे नविन रुग्ण
खारघर-२
खारघर सेक्टर – २१ येथील ३९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती शिवडी मुंबई येथे मेडलाईफ ई कॉमर्स कंपनीमध्ये मॅनेजर आहे . हया व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .
खारघर सेक्टर – ३५ई येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीचा मुलगा यापूर्वी कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेला होता . हया व्यक्तीला त्याच्या मुलापासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .
कामोठे-५
कामोठे सेक्टर – १२ येथील ४५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये अॅम्बुलन्सवर वाहनचालक म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला मुंबईमध्येच रूग्ण ने – आण करतेवेळी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर १० येथील ३८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती शताब्दी हॉस्पीटल, गोवंडी येथे वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत आहे. ह्या व्यक्तीला त्याच्या कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर – ११ येथील ६ महिन्याचा १ मुलगा कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर मुलाच्या कुटुंबातील ३ व्यक्ती यापुर्वी कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर मुलाला त्यांच्यापासूनच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर – ३४ येथील २९ वर्षीय १ महिला कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला सेंट जॉर्ज हॉस्पीटल, मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून ती कोव्हिड – १९ पेंशन्टसाठी सेवा देत होती. त्यांना हॉस्पीटलमध्येच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर – ०६ येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती USV फार्मा कंपनी , गोवंडी येथे कार्यरत असून त्यांना कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पनवेल-१
पनवेल एम. जी. रोड टपालनाका येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती मुंबई येथे पोलिस कर्मचारी आहे. सदर व्यक्तीला मुंबई येथे कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
नविन पनवेल-१
नविन पनवेल सेक्टर – ४ येथील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती रिलायन्स कंपनीमध्ये कार्यरत असन त्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
उलवे-४
प्लॉट नं. १९७, सेक्टर ३, उलवे येथील ३५ वर्षीय व्यक्ती कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्ती वाहतूक पोलीस विभागात कार्यरत आहे. सदर व्यक्ती कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
रिदधीसिदधी हौसिंग सोसायटी, सेक्टर ८, उलवे येथील ३१ वर्षीय महिला आणि त्यांची दोन लहान मुले , मुलगा ५ वर्ष, मुलगी १ वर्ष, कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदरच्या तीनही व्यक्ती एकाच कुटुंबातील असून कुटुंब प्रमुख सदर महिलेचे पती हे याआधी कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदर महिलेला व त्यांच्या मुलांना त्यांच्या पतीपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
विचुंबे-३
ओमकार पार्क, विचुंबे येथील २६ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदरच्या तीनही व्यक्ती एकाच कुटुंबातील असून कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदर दोन्ही महिला व एक पुरुष यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याकडून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
उरण-१
मोरा, ता. उरण येथील ११ वर्षीय मुलगी कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेली असून सदर मुलीचे आईवडील याआधी कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. त्यांच्या पासून तिला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
अलिबाग-१
तलावडे, ता. अलिबाग येथील 39 वर्षीय पुरुष कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेली असून सदरची व्यक्ती धारावी, मुंबई ते तलावडे, अलिबाग असा प्रवास करीत असे. त्यांना (एसडीएच) पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.