पनवेल दि.२०: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उलवे नोड मध्ये भव्य आणि दिव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, गव्हाण यांच्या वतीने गुरुवारी हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. या निमित्ताने संपूर्ण उलवे परिसर भगवेमय होऊन शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रामशेठ ठाकूर मैदान येथे आयोजित करण्यात आलेला द फोक आख्यान अंतर्गत महाराष्ट्राचा शाहिरी बाणा हा विशेष कार्यक्रम.
सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने आणि शाहिरा ऋतुजा माने यांनी आपल्या खणखणीत आवाजात आणि प्रभावी सादरीकरणातून शिवचरित्र, महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास, मावळ्यांचा पराक्रम आणि मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले. शाहिरांच्या पोवाड्यांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले, तर इतिहासातील विविध प्रसंगांच्या जिवंत सादरीकरणामुळे मैदानावरील वातावरण शिवमय झाले होते. या सांस्कृतिक सोहळ्याला उलवे नोडसह परिसरातील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. या सोहळ्यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, पनवेल पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळी, पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, विकास घरत, सुमित झुंझारराव, नगरसेविका राजश्री वावेकर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, सागर ठाकूर, भार्गव ठाकूर, स्वप्नील ठाकूर, विश्वनाथ कोळी, सुधीर ठाकूर, सी. एल. ठाकूर, अनिल खोडपे, किशोर पाटील, सचिन घरत, योगिता भगत, निलेश खारकर, साईचरण म्हात्रे, ज्योत्सवा ठाकूर, वंदना पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष वसंत पाटील, उपाध्यक्ष अशोक कडू, जयवंत देशमुख, खजिनदार गजानन घरत, राज ठाकूर, प्राप्ती ठाकूर, रोशन म्हात्रे, सायली वाडवळकर, कमलेश कुमार, अपूर्व ठाकूर, बंटी घरत, अपूर्व ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीसह गव्हाण, कोपर, शेलघर, शिवाजीनगर, बेलपाडा, न्हावा, न्हावाखाडी, उलवे, वहाळ, मोरावे, बामणडोंगरी, जावळे आणि उलवेनोड येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामुळे शिवरायांच्या विचारांचा जागर झाला आणि परिसरातील सांस्कृतिक एकजूटही अधोरेखित झाली.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!