पनवेल दि. 29: कोरोना विष्णूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने एकवीस दिवसाचा लॉक डाऊन घोषित केला. मात्र दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजावर याचा विपरीत परिणाम झाला. ग्रामीण भागात गावागावाच्या सीमा बंद करण्यात त्यामुळे मजुरीस कोणी घेत नाही, आणि लाकडाच्या मोळ्या विकल्या जात नाहीत काही आदिवासी वाडीत खेकडे पकडून गुजारा चालू आहे. अश्या स्थितीत त्याच्यावर उपासमारीची वेळ आलीय या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता संतोष ठाकूर यांनी मदतीचे आवाहन केले याला प्रतिसाद देत खारघर येथील जयेश गोगरी, बिना गोगरी, दिनेश रावलीया यांनी शाश्वत फावडेशनच्या माध्यमातून कोरलवाडी या आदिवासी वस्तीत 5 किलो तांदूळ, कांदा एक किलो, बटाटा एक किलो, गोडेतेल, मीठ अश्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. पनवेल तालुक्यातील कर्नाळा, साई, आपटा ग्रामपंचायत हद्दीतील डोगर दऱ्यात वीस आदिवासी वाड्या येतात आणि या वाड्यात दोन हजार कुटुंब राहतात . यापैकी शनिवार कोरवाडी येथील कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूच वाटप करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष शिंदे, नीरज पाटील, विजय मासाल उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!