नवी मुंबई, दि.24 : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक दि. 26 जून, 2024 रोजी होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारकर्त्यानी त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाही अशा मतदारांनी त्यांची ओळख पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करता येईल. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
विधानपरिषदेची द्विवार्षिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीकरिता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त खालील नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.
आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), राज्य/केंद्र सरकारद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र उपक्रम, स्थानिक संस्था किंवा इतर खाजगी औद्योगिक घरे, खासदार/आमदार/एमएलसी यांना अधिकृत ओळखपत्रे जारी केली जातात. ज्या शैक्षणिक संस्थांनी दिलेले सेवा ओळखपत्र संबंधित शिक्षक/पदवीधर मतदार संघात काम केले जाऊ शकते. विद्यापीठाने जारी केलेले पदवी/डिप्लोमाचे प्रमाणपत्र, मूळ स्वरूपात, सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले शारीरिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र, वर युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड अशी कागदपत्रे पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.
दिनांक 26 जून,2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत होणाऱ्या मतदानाच्या दिवशी पदवीधर/शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!