जयपूर फूट, २डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया, विविध तपासण्या आणि औषधोपचार
अपंगांना तीन चाकी सायकल, नेत्र तपासणी व चष्मे वाटप,


पनवेल दि.१०: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. या अंतर्गत हे महाशिबीर होणार आहे. या महाशिबिराच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी शिबीर नुकताच पार पडले असून महाशिबीर येत्या रविवारी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात सकाळी ०९ ते सायंकाळी ०४ वाजेपर्यंत होणार आहे. या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, महिलांचे आजार, हृदयरोग, हाडांचे रोग, मधुमेह, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, बालरोग, त्वचा व गुप्तरोग तपासणी, दंतरोग तपासणी, नाक-कान-घसा, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, ईसीजी तपासणी, कॅन्सर तपासणी, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ० ते १८ वयोगटापर्यंत २डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया, डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, तसेच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र, देण्याबरोबरच मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूट बसविण्याचे शिबीरही यावेळी होणार आहे. यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड सुद्धा या शिबिरात तयार करून देण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. या महाशिबिरात साधु वासवानी मिशन पुणे, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरुळ, भारती विद्यापीठ खारघर, तेरणा मेडिकल कॉलेज नेरुळ, येरळा मेडिकल ट्रस्ट, साईट फर्स्ट केअर, नायर हॉस्पिटल, व्हिट सेंटर, शंकरा आय हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळ, सत्य साई संजिवनी हॉस्पिटल खारघर या नामांकित वैद्यकीय संस्थांचा सहभाग असणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!