पनवेल,दि.14 : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्रावर राज्य शासनाच्या सूचनेनूसार कोविशिल्डचा फक्त दुसरा डोस सर्वत्र दिला जात होता. परंतू राज्य शासनाच्या नव्याने आलेल्या सूचनेनूसार उद्या पासून 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला व दुसरा दोन्ही डोसचे लसीकरण केंद्रावर उपलब्ध असणार आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सध्या सुरू असणारे लसीकरण केंद्र
1.टाटा हॉस्पीटल,खारघर केंद्र1
2. आरोग्य उपकेंद्र नवीन पनवेल,
3. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 कोळीवाडा, पनवेल,
4. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 4 कळंबोली,
5. टाटा हॉस्पीटल खारघर केंद्र 2,
6. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र6, कोमोठे,
7.आरोग्य उपकेंद्र,कर्नाटक समाज हॉल, नवीन पनवेल,
8. आरोग्य उपकेंद्र, नावाडे,कळंबोली,
9. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 3 नवीन पनवेल,
10. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र1 गावदेवी पाडा,पनवेल
11. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर,
12. आरोग्य केंद्र रामशेठ ठाकूर इंग्लीश मिडीयम स्कूल , कोमोठे,
13.आरोग्य उपकेंद्र रोटरी कम्यूनिटी सेंटर, सेंट जॉर्ज चर्च जवळ नवीन पनवेल.
लसीकरण केंद्रावर जाताना सोबत वयाचा दाखला (आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स) असणे बंधनकारक असेल.