मुंबई दि.२१: माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात purple  ट्रॅव्हल्स ची खाजगी बस क्रमांक.MH14GU3405 अपघात होऊन उलटली. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. यामधे २ पुरुष व ३ महिला अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला.
या बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.
पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!