पनवेल दि.१४: विवाहाचा ५० वा वाढदिवस म्हणजे सुवर्णमहोत्सवी लग्न वर्ष. आणि हा दाम्पत्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा आणि जोडीच्या यशस्वी जीवनाची वाटचालीचा सुवर्ण क्षण असतो, त्या अनुषंगाने ५० वा विवाह वाढदिवस म्हणजे एक सोहळाच असतो व तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण पनवेलमधील के. जी. म्हात्रे व त्यांच्या सुविद्य पत्नी उर्मिला म्हात्रे यांनी विवाहाचा वाढदिवस उत्सव म्हणून साजरा न करता ५० हजार रुपयांची आर्थिक मदत महापौर सहाय्यता निधीस देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. 
पनवेल पंचायत समिती कार्यालयातील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक व सध्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल जनसंपर्क कार्यालय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले के.जी म्हात्रे व त्यांच्या पत्नी पनवेल नगरपालिकेच्या सेवानिवृत्त मुख्याधिपिका उर्मिला म्हात्रे या या उभयताच्या विवाहास ५० वर्ष झाले. त्यांनी लग्नाचा हा वाढदिवस साजरा न करता कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान म्हणून स्वतः ५० हजार रुपयांचे योगदान महापौर सहाय्यता निधीला दिले आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत के. जी. म्हात्रे यांनी मदतीचा धनादेश पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी म्हात्रे यांचे चिरंजीव रोहित उपस्थित होते. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!