पनवेल दि.15: लॉकडाऊन हा शब्द सद्या सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झाला आहे आणि तो अंगवळणी पण पडला आहे….लॉकडाऊनच्या या कालखंडात आदर्श समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श समूहाच्या बी.एड.महाविद्यालयाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत…….याचाच एक भाग म्हणजे आज दि.१४/०५/२०२० रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सारिका नवाते यांच्याशी बी.एड.व एम.एड.च्या विद्यार्थ्यांनी zoom वर दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत online मनसोक्त गप्पा मारत ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे हे समजून घेतले…
प्रसिद्ध अभिनेत्री सारिका नवाते, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते, संचालिका संगिता विसपुते, नानासाहेब विसपुते , डॉ.सीमा कांबळे सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला….
सेलिब्रेटी आणि त्यांच्याशी संवाद हा आजच्या पिढीचा जिव्हाळ्याचा विषय आहे…..सद्या निर्माण झालेल्या ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे ??? हा थोडा गंभीर प्रश्न आहे …याच्याच उत्तरासाठी आज कुंकू टिकली आणि ट्टयाटू, मोलकरीण बाई अशा प्रसिद्ध मालिका तर पहिली शेर दुसरी सव्वाशेर अशा मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या सारिका नवाते यांनी Coffe आणि बरंच काही…. या कार्यक्रमात सर्वांशी मनसोक्त गप्पा मारल्या…. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.सीमा कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले….सारिका नवाते त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी ध्वनिचित्रफीत सादर करण्यात आली…..या नंतर धनराजजी विसपुते यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अतिथींना आदर्श समूहाच्या कार्याची माहिती देत आपण सर्वांनी ताण तणाव व्यवस्थापन करण्यासाठी काय करावे या बाबत सर्वांना एक नवी दिशा दिली……या नंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या आवडत्या अभिनेत्रीशी गप्पा मारल्या….आणि यातून ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे समजून घेतले…..या नंतर डॉ.सीमा कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले…..समारोप प्रसंगी सारिका नवाते यांनी महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या….
Coffe आणि बरंच काही…..या कार्यक्रमातून खरोखर बरंच काही जाणून घेता आलं…